समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

सैनिक शाळेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय, क्रमांक इडीसी-२००५/प्र.क्र.७८/मावक-२, दिनांक ८ फेब्रुवारी, २००६

१) शासन निर्णय : इबीसी-१०७७/२६२५४/डेस्क-५, दिनांक १ ऑगस्ट १९७८

२) शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.१८४/मावक-२, दिनांक १७ सप्टेंबर २००३

उद्दिष्ट :

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे आकर्षण त्यांच्यात विद्यार्थीदशेतच निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्त्व देशभक्ती इत्यादि गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.

अटी व शर्ती :

  1. विदयार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  2. विदयार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 हजाराच्या आत असावे.
  3. सैनिकी शाळेतील वर्ग 6 ते 10 शिक्षण घेत असणा-या मुला/मुलींना प्रति वार्षिक रु. 15000/- निर्वाह भत्ता देण्यात येतो.

लाभाचे स्वरूप :

मान्यताप्राप्त सैनिकी शाळेतील विध्यार्थ्यांना प्रतिवर्षी रु. १५०००/- सैनिकी शाळा निर्वाह भत्ता देण्यात येते.

सैनिकी शाळा:

  1. भोसला मिलिटरी स्कूल,चक्किखापा,गोधनी,नागपूर
  2. वर्धमान मुलींची सैनिकी शाळा, वडधामणा,अमरावती रोड,नागपूर