समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

उद्दिष्ट :

१) अनुसूचित जाती, नवबौद्ध, प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

२) यासाठी इयत्ता १० वी मध्ये ७५% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता ११ वीं मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील मुलां- मुलींसाठी ही योजना लागू आहे.

३) ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता ११ वीं व १२ वी मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध, प्रवर्गातील मुलां-मुलींसाठी आहे.

लाभाचे स्वरूप :

इयत्ता शिष्यवृत्ती दर कालावधी रुपये
११ वी रु.३००/- दरमहा १० महिने रु.३०००/-
१२ वी रु.३००/- दरमहा १० महिने रु.३०००/-