समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

परराज्य शिष्यवृत्ती

उद्दिष्ट :

महाराष्ट्र राज्यातील (नागपूर जिल्हा) रहिवाशी असणारे परंतु दुसऱ्या राज्यात प्रवेश घेतलेल्या अनु.जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदर योजना लागु आहे.

अटी व शर्ती :

१) विद्यार्थी हा अनु. जाती, नवबौद्ध, प्रवर्गातील असावा.
२) अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
३) विद्यार्थी शालांत परीक्षोत्तर व त्यापुढील शिक्षण घेत असलेला असावा.
४) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

लाभाचे स्वरूप :

१) विद्यार्थ्यास निर्वाहभत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क.
२) अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना दरमहा रु. २५० ते रू.७०० दराने निर्वाहभत्ता.
३) वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु.४०० ते रु.१३५० निर्वाहभत्ता