समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सहाय्यक अनुदान

उद्दिष्ट :

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पूर्ण करता यावा, ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे, आर्थिक दुरावस्थामुळे मागासवर्गीय पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत आणि मागासवर्गीय विद्याथ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उददेशाने ही योजना सन 1950-51 पासून कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्हयामध्ये स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणारे 98 व जिल्हा परिषदमार्फत चालविण्यात येणारे 4 असे एकूण 102 अनुदानित वसतिगृह कार्यरत आहे. 

वसतिगृह प्रवेश :-  

अनुदानित वसतिगृहांमध्ये अनुसूचित जातीच्या विद्याथ्यांबरोबर मांग, वाल्मिकी, कातकरी व माडीया गोंड या प्रवगांतील स्थानीक विद्यार्थ्यांना आणि अनाथ, 
दिव्यांग व निराश्रित विद्यार्थ्यांना प्राधान्याने विहित टक्केवारीच्या अधिन राहुन प्रवेश देण्यात येतो

कर्मचारी मानधन :-

वसतिगृह अधिक्षक रूपये 10000/- स्वयंपाकी रूपये 8500/- मदतनीस रूपये 7500/- व चौकीदार रूपये 7500/- दरमहा मानधन देण्यात येते. 

परिपोषण अनुदान :-

प्रति विद्यार्थी प्रतिमहा रूपये 1500/- प्रमाणे दहा महिण्याकरीता निवासी विद्यार्थी मान्य संख्येनुसार परिपोषण अनुदान देण्यात येते. 

इमारत भाडे :-

इमारत भाडयापोटी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाडयाच्या 75 टक्के भाडे संस्थेस देण्यात येते.