यात कर्णबधीर व्यक्तीना पॉकेट हियरिंग एड, बिहाइंड द ईयर एड व इनव्हिजिबल हियरिंग एड पुरविण्यात येत आहे. या योजनेसाठी किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त कर्णबधीर असलेला ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थी असावा, तसेच तो नागपुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहीवासी असावा. यासाठी लाभार्थ्यांचे वय 01 वर्षे पूर्ण असावे तसेच लाभार्थ्यांचे वैद्यकीय दिव्यांग महामंडळाचे बोर्ड प्रमाणपत्र ऑडियोमेट्री रिपोर्ट असणे आवश्यक आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसावा.
संपर्क:- संबंधित तालुक्यातील ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालय