समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

मनोविकलांग व्यक्तींकरिता नॅशनल ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणा-या निरामय विमा योजनेचे हप्ते भरणेकरिता अर्थसहाय्य देणे

मनोविकलांग व्यक्तींकरिता नॅशनल ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणा-या निरामय विमा योजना कार्यान्वित केली आहे. सदर योजनेमध्ये नागपुर शहर व ग्रामीण भागात सर्व साधारण शाळा तसेच विशेष शाळेतील विशेष शिक्षण घेत असलेल्या मतिमंद, ऑटिस्टिक, सेरीब्रल पालसी, बहुविकलांग या प्रर्वगातील दिव्यांगांचा सर्व साधारण विमा जिल्हा समाज कल्याण विभागाकडून भरला जातो. सदर योजनेचा लाभघेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी विशेष शाळेमार्फत-आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्रासह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. या योजनेत मतिमंद, ऑटिस्टिक, सेरीब्रल पालसी, बहुविकलांग दिव्यांगांचा विमा नविन लाभाष्यर्थ्यांसाठी रु. 400/- व नुतनीकरणासाठी रु. 250/-देण्यात येते.

 

संपर्क:- संबंधित तालुक्यातील ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालय