समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

मतिमंद बालगृहे योजना

1. शासन निर्णय: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 30/01/2014. 

उद्दिष्टे :-

बालहक्क (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2000 व सुधारीत नियम 2006 अन्वये अनाथ मतिमंद बालकांसाठी एकुण 19 विशेष बालगृहे स्वयंसेवी संस्थाकडून चालवली जात असून राज्यातील 
13 जिल्हामध्ये ही बालगृहे कार्यरत आहे. 

नागपुर जिल्ह्यामध्ये रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथे एकविरा मतीमंद मुलांचे  13  बालगृह कार्यान्वित आहे. 

निकष :-

1. विहीत नमुन्यात बाल कल्याण समिती यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. 
2. अर्जदाराचे अपंगत्व किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे व तो अनाथ असावा. 
3. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, 

लाभाचे स्वरुप :-

या बालगृहामध्ये प्रवेशिांना अपंगाच्या विशेष शाळा / कर्मशाळा तसेच वसतिगृहांना असलेल्या निकषानुसारच देखभाल व निर्वाहासाठी अनुदान देण्यात 
येत असून शैक्षणिक, आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

संपर्क:- संबंधित बालगृहाचे मुख्याध्यापक