समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

वृध्दाश्रम योजना

उद्दिष्टे :-

वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे व सुखासमाधानाने घालविता यावा या करीता योजना सुरु करण्यात आली. 

अटी व शर्ती :-

1. शासन मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृध्दाश्रम चालविण्याची योजना आहे. 
2. संस्था ही संस्था अधिनियम 1960 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीकृत असावी. 
3. सदर वृध्दाश्रम अन्न, वस्त, निवारा, औषधोपचार, करमणूक, मनोरंजनाची सोय मोफत करण्यात येते. 
4. वृध्दाश्रमात निराधार व निराश्रीत 60 वर्ष वरील पुरुष व 55 वर्ष वरील श्रीयांना प्रवेश देण्यात येतो. 
5. प्रत्येक वृध्दामागे परिपोषण अनुदान 1 फेब्रुवारी 2019 पासून प्रतिमाह रु. 1500/- देण्यात येते 
6. वृध्दाश्रमात प्रवेश संख्या कमीत कमी 25 आहे तसेच प्रत्येक वृध्दामागे इमारत बांधकाम अनुदान रु. 750/- एकदाच दिले जाते. 

संपर्क:- संबंधित वृद्धाश्रमाचे अधीक्षक