समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे

1. शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 05/12/2011. 2. शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 01/08/2013. 3. शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 06/10/2021.

उदिष्टे : -

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यांमध्ये नळ पाणी पुरवठा, गटारे, स्वच्छता विषयक सोयी, जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर इत्यादी पायाभूत व्यवस्था करुन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही योजना आहे.

लाभाचे स्वरूप :-

शासन निर्णय दि. 06/10/2021 अन्वये लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्येक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते.

अ.क्र. लोकसंख्या अनुदान (रुपये)
1 10 ते 25 4 लक्ष
2 26 ते 50 10 लक्ष
3 51 ते 100 16 लक्ष
4 101 ते 150 24 लक्ष
5 151 ते 300 30 लक्ष
6 301 च्या पुढे 40 लक्ष

संपर्क:- संबंधित गावातील ग्रामपंचायत कार्यालय