समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

1. शासन निर्णय :- समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रोडा विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 12/01/1996. 
2. शासन निर्णय :- समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडां व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 23/05/2003. 
3. शासन निर्णय :- समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 31/05/2005. 
4. शासन निर्णय :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 02/07/2016. 
5. शासन निर्णय :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 30/01/2019. 
 

उद्दिष्टे:-

इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय (अनुसूचित जाती, विजाभज, विमात्र, इमाव) मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
 

अटी व शर्ती :-

1. उत्पन्न व गुणांची अट नाही. 
2. अर्जकरण्याची आवश्यकता नाही. (मात्र विद्यार्थिनीचे नावाचे स्वतःचे आधार संलग्न बैंक खाते सादर करणे आवश्यक आहे.)  
 

शिष्यवृत्तीचे स्वरूप :-

इयत्ता शिष्यवृत्तीचा दर (रू.) कालावधी
5 वी ते 7 वी 60/- दरमहा 10 महिने
8 वी ते 10 वी 100/- दरमहा 10 महिने 

संपर्क:- संबंधित शाळेचे मुख्याध्यापक